Viral Video : काड्या करणारे लोक! आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : काड्या करणारे लोक! आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

एखादा व्यक्ती पुढे जात असेल किंवा प्रगती करत असेल तर त्याला मागे खेचणारे अनेक लोकं असतात. तर एखाद्याच्या कामात अडथळा आणणारे सुद्धा अनेक असतात. अशाच दोन पक्षांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

(Anand mahindra shared two birds video)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन पक्षी दिसत आहेत. तर एक पक्षी खड्ड्यातून माती वर काढताना दिसत आहे आणि एक पक्षी वरून माती खड्ड्यात टाकत आहे. हा व्हिडिओ खूप काही शिकवून जातो. माती वर काढणाच्या पक्षाच्या कामात दिसरा पक्षी काड्या करत आहे. "आपण आठवड्याच्या मध्ये आपण एखाद्या प्रोजेक्टच्या टीममध्ये काम करत आहोत असं वाटतं पण आपल्या सर्वांचे उद्दिष्ट एकंच आहे का हे पाहून घ्या" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा: Video: कल्याणमध्ये चिंचपाडा रोडवर बिबट्याचा धुमाकूळ; 2 जखमी

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.