Video: कल्याणमध्ये चिंचपाडा रोडवर बिबट्याचा धुमाकूळ; 2 जखमी

Video
VideoSakal

कल्याण : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात चक्क बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळी चिंचपाडा रोडवरील श्रीराम अनुग्रह टॉवर येथे हा बिबट्या सध्या शिरला आहे. वन विभाग, केडीएमसी, अग्निशमन दल, प्राणी मित्र संघटना आदी घटनास्थळी दाखल असून बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

(kalyan east leopard attack latest updates)

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पहाटे भक्ष्याच्या शोधत हा बिबट्या कल्याण पूर्वेत आला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.स्थानिकांनी याची माहिती वनविभागाला दिली आणि सर्व सूत्र तातडीने फिरली. नागरिकांच्या आरडा ओरड्यामुळे श्री राम अनुग्रह या सोसायटी मध्ये पहिल्या मजल्यावरील पॅसेज मध्ये त्याला अडकवून ठेवण्यात आले आहे. मात्र दोन नागरिकांना या बिबट्याने जखमी केलं असून तीन जनावरांवर देखील हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इमारतीमधील तीन लोकांवर हल्ला करून मग हा बिबट्या इमारतीत शिरला. आता इमारतीमधील नागरिकाना रेस्क्यू करत बाहेर काढण्यात आला असून इमारत रिकामी केली असल्याची माहिती वन विभागचे अधिकारी आर. चन्ने यांनी दिली.

काही वेळातच बिबट्याला जेरबंद करण्यात येणार असून इमारत परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या घटनमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com