

भारतात जावई पहिल्यांदा सासुरवाडीला येणे हे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसते. संपूर्ण कुटुंब जावयाचे स्वागत करण्यात सहभागी असते. लोक त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम व्यवस्था करतात आणि त्याचे स्वागत करतात. परंतु कधीकधी, हे स्वागत मर्यादा ओलांडते. आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यातील एका गावात असेच घडले. एका कुटुंबाने मकर संक्रांतीसाठी जावयाला आणि मुलीला पहिल्यांदाचा घरी बोलालवले. पारंपारिक स्वागत इतके भव्य होते की हा कार्यक्रम जवळपासच्या अनेक गावांमध्ये चर्चेचा विषय बनला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.