
Viral Video : पळा पळा, हत्ती पिसाळला; गाड्या उडवल्या
आपण कधी प्राणीसंग्रहालयात गेला असेल तर आपण हत्ती पाहिला असेल. पण पिसाळलेला हत्ती आपण कधी पाहिला नसेल. कधी जंगलात गेला तर कधीकधी आपण आक्रमक झालेले प्राणी पाहू शकतो पण पिसाळलेले प्राणी प्रत्येक वेळी पाहायला मिळत नाही. पिसाळलेला हत्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा कर्नाटकमधील बंगळूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये पिसाळलेला हत्ती पळत पळत उभे असलेल्या लोकांकडे येऊ लागतो आणि तिथे उभा केलेल्या गाड्या सोंडेने उचलून फेकून देतो. त्यानंतर तिथे उभे असलेले सर्वजण हत्तीला घाबरून पळून जातात.
दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर हा व्हिडिओ कला कृष्णस्वामी या आयपीएस अधिकाऱ्यांने शेअर केला आहे. या व्हिडिओला ट्वीटरवर १३ हजार लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया यावर व्यक्त केल्या आहेत.