Viral Video : किडनॅपिंगसाठी फेमस ओमनीत गुरंढोरं, अख्खा संसार निघाला गाडीतून

Video
VideoSakal

एका दुचाकीवर सात ते आठजण बसल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल. किंवा गाडीवरील स्टंट पाहिले असतील पण एका ओमनी गाडीमध्ये थेट आख्खा संसारंच घातल्याचं आपण पहिल्यांदा ऐकत असाल. पण हो. हे खरं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

ओमनी गाडी बघितली की लहानपणी घाबरगुंडी उडायची. किडनॅप करण्यासाठी अनेकवेळा अशा गाड्यांचा वापर होतो पण या गाडीत जनावरांसहीत आख्खा संसारंच चालल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गाडीच्या टपावर खूप मोठं सामानाचं गाठोडं ठेवलं असून एक व्यक्ती गाडीच्या पाठी मागे लटकून प्रवास करत आहे. गाडीवरील सामान त्यांनी बांधलं असून जनावरांचे मुंडके गाडीच्या खिडकीतून बाहेर आल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून अनेकांनी शेअर केला आहे. हायवेने सुसाट जात असलेल्या या गाडीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील अशा व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचे मनोरंजन होत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com