Trending News: युरोपातलं सर्वात जुनं गाव सापडलं; ८००० वर्षांपूर्वी होती लोकवस्ती

तज्ञांनी या ठिकाणाच्या रेडिओकार्बन डेटिंगद्वारे त्याचे वय निश्चित केले आहे.
Oldest Village in Europe
Oldest Village in EuropeSakal

पुरातत्वशास्त्रज्ञांनी युरोपमधील सर्वात जुनं गाव शोधून काढलं आहे. हे अल्बेनियामधील ओह्रिड सरोवराच्या काठावर वसलं होतं. युरोपातील सरोवराच्या काठावर आढळणारी ही सर्वात जुनी वस्ती असल्याचं म्हटलं जातं. तज्ञांनी या ठिकाणाच्या रेडिओकार्बन डेटिंगद्वारे त्याचे वय निश्चित केले आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञांना अल्बेनियातील ओह्रिड सरोवराजवळ उत्खननात युरोपातील सर्वात जुनं गाव सापडलं आहे. संशोधकांच्या मते हे गाव 8000 वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. आजूबाजूला टोकदार रचना असलेल्या कुंपणाने संरक्षित असलेले हे गाव एक अनमोल खजिना असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. आता शोध जसजसा पुढे जाईल तसतसं त्याचं सर्व रहस्य उलगडणं अपेक्षित आहे.

Oldest Village in Europe
Trend Of Wearing Black : निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे घालण्याचा ट्रेंड कधी आणि कसा सुरू झाला?

संशोधकांचं म्हणणं आहे की या तलावाच्या काठी पूर्वी मचानांवर घरं बांधलेली होती. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, तलावाच्या काठावर वसलेलं हे युरोपमधील आतापर्यंतचं सर्वात जुनं गाव आहे. रेडिओकार्बन डेटिंगच्या माध्यमातून या गावाच्या वयाचा अंदाज लावण्याचाही संशोधकांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 6000 ते 5800 इसवी सन पूर्वी हे गाव इथे अस्तित्वात होतं. या गावात सुमारे 500 लोक राहत असल्याचा अंदाज आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकतर पाण्याच्या वरच्या मचानांवर घरं बांधली गेली होती किंवा तलावाच्या काठावर अशी घरं होती, जी पूर आल्यावर पाण्यात बुडली होती. काही पुराव्यांच्या आधारे पुरातत्वशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की या गावाभोवती किल्ल्यासारखी रचना होती. गावाच्या सुरक्षेसाठी चारही बाजूंनी हजारो भाले कुंपण घालण्यात आल्याचा अंदाज आहे. इतकं मोठं सुरक्षा कुंपण घालण्यासाठी गावातील लोकांना संपूर्ण जंगल तोडावे लागले असते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

Oldest Village in Europe
Trending News: कोट्यधीशाची बायको असूनही करतेय नोकरी; महिलेचे खुलासे ऐकून हैराण व्हाल!

या गावातील लोकांनी सुरक्षेसाठी एवढे मोठे कुंपण का लावले असेल याची पुरातत्वशास्त्रज्ञांना कल्पना नाही. इथे गाव वसवण्यासाठी किमान एक लाख भाले तलावाच्या तळाशी गाडले गेले असावेत असा संशोधकांचा अंदाज आहे. अभ्यासक या गावाला अभ्यासासाठी एक मौल्यवान खजिना मानत आहेत. स्विस युनिव्हर्सिटी ऑफ बर्नमधील पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक अल्बर्ट हाफनर म्हणतात की भूमध्य समुद्र आणि आल्प्सच्या प्रदेशात आतापर्यंत ओळखल्या जाणार्‍या लेकसाइड वसाहतींपेक्षा ते शंभर वर्षे जुनं आहे.

हाफनर सांगतात की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे ते युरोपमधील सर्वात जुने तलावाच्या कडेला असलेले गाव आहे. या व्यतिरिक्त, या भागात सापडलेल्या सर्वात जुन्या वस्त्यांमध्ये, इटलीच्या आल्प्स भागात एक निओलिथिक गाव देखील आहे, जे ख्रिस्तापूर्वी 5000 वर्षांपूर्वी होते. ज्या टीमने हा शोध लावला त्यात हाफनर यांच्यासह स्वित्झर्लंड आणि अल्बेनिया इथल्या पुरातत्वशास्त्रज्ञांचा समावेश होता. (Trending News)

ओह्रिड सरोवराच्या काठावर वसलेलं हे गाव पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने चार वर्षे खोदून काढलं आहे. हे गाव शोधण्यासाठी ही टीम ओह्रिड तलावाजवळील लिन नावाच्या ठिकाणी खोदकाम करत होती. हे ठिकाण उत्तर मॅसेडोनिया आणि अल्बेनियाच्या सीमेवर आहे. ओह्रिड लेक हे जगातील सर्वात जुन्या तलावांपैकी एक मानलं जातं. या सरोवराविषयी असं म्हटलं जातं की ते सुमारे दहा लाख वर्षांपासून पृथ्वीवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com