Viral Video : रामलीला करताना कलाकाराचा स्टेजवरच हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ आला समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : रामलीला करताना कलाकाराचा स्टेजवरच हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ आला समोर

सध्या तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या काळानंतर हे प्रमाण खूप वाढले असून कोरोना लसीमुळे हे प्रमाण वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण तज्ज्ञांनी असा कोणताही दावा केलेला नाही. असाच एका तरूणाचा हृदायविकाराने मृत्यू झालेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

(Heart Attack Youth Death Viral Video)

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रामलीला कार्यक्रमामधील आहे. एक कलाकार भगवान शंकराची भूमिका करत असून यामध्ये आरती सुरू असताना तो अचानक कोसळतो आणि जागीच त्याचा मृत्यू होतो. तर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तर अनेक लोकांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

सध्या २० ते ४० वयाच्या पुरूषामध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून ही चिंतेची बाब आहे. तर याप्रकरणी प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तर प्रत्येक वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेही तेवढेच गरजेचे आहे.