
Viral video of Vatsala the elephant’s last moments: जगातील सर्वात वयस्कर आशियाई हत्तीणी वत्सला हिचे मंगळवारी (८ जुलै) रोजी मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात आरोग्यासंबंधित समस्यांमुळे निधन झाले. या हृदयद्रावक बातमीनंतर, एका वन्यजीव छायाचित्रकाराने हत्तीणीच्या शेवटच्या क्षणांचे काही फोटो काढले. 'वत्सला दादी', ज्याला प्रेमाने म्हटले जात असे, तिचे भावनिक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि नेटकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.