ATM Baba : अय्यो! पठ्ठ्या द्यायचा 15 मिनिटांमध्ये ATM फोडायची ट्रेनिंग, पोलिसांनी केलं जेरबंद

विशेष म्हणजे याला एटीएम बाबा म्हणून ओळखले जातात.
ATM Baba
ATM Babasakal

ATM Baba : तुम्ही अनेक ट्रेनिंग, प्रशिक्षणाविषयी ऐकले किंवा वाचले असावेत पण तुम्ही कधी एटीएम कसं फोडायचं, अशा ट्रेनिंगविषयी वाचलं का? उत्तर प्रदेशमध्ये अशाच एका व्यक्तीला पोलिसांनी पकडलंय. सुधीर मिश्रा असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे याला एटीएम बाबा म्हणून ओळखले जातात. (ATM Baba arrested who has given training how to break open ATMs in just15 minutes)

ATM Baba
Viral Video : नागीन, कोंबडा डान्सनंतर आता नव्या डान्सचा ट्रेंड; दुचाकी 8 फूट उचलून...

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सुल्तानपुर रोडवर असलेल्या एसबीआय बँकच्या एटीएम मशीनला 16 मिनिटांमध्ये फोडून त्यातून 39 लाख 58 हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी एटीएम बाबा त्याच्या पत्नी आणि मित्रासह पकडले आहेत.

एवढंच काय तर 9 लाख 13 हजार पाचशे रुपये जप्त केले आहे. सोबतच एटीएम फोडण्याचं सामानही गोळा केलंय. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे एटीएम बाबा म्हणजेच सुधीर मिश्रा 15 मिनिटमध्ये एटीएम फोडायचं ट्रेनिंग द्यायचा.

ATM Baba
CVV Number : तुमच्या ATM कार्डवर असलेला CVV नंबर कधीच कोणाला सांगू नका, कारण...

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे सुधीर मिश्रा म्हणजेच एटीएम बाबाच्या या कामात त्याची पत्नीही सहभागी असायची. ती गावाची सरपंच होती. एटीएम बाबाची पत्नी रेखा मिश्रा सुद्धा त्यांच्या या गुन्ह्यांमध्ये मॉनिटरिंग करायची.

हे संपुर्ण प्रकरण अंगावर काटा आणणारे आहे. सध्या या एटीएम बाबाची सर्वत्र चर्चा सुरू असून सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलचं व्हायरल झालंय. नेटकरी या एटीएम बाबाच्या अनोख्या ट्रेनिंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com