Viral Video : ‘’मी सहन करू शकलो नाही.., मी राजीनामा दिलाय... ’’, सांगत चक्क जीएसटी उपायुक्त पत्नीशी बोलताना ढसाढसा रडले!

Emotional Resignation of GST Deputy Commissioner : जाणून घ्या, नेमकं त्यांना काय सहन झालं नाही आणि कुठे घडली आहे ही घटना?
Ayodhya GST Deputy Commissioner Prashant Kumar Singh seen emotional while speaking to his wife after submitting his resignation, video goes viral online.

Ayodhya GST Deputy Commissioner Prashant Kumar Singh seen emotional while speaking to his wife after submitting his resignation, video goes viral online.

esakal

Updated on

Ayodhya GST Officer Resignation, Prashant Kumar Singh, Viral Video अयोध्येचे जीएसटी उपायुक्त प्रशांत कुमार सिंह हे त्यांच्या पदावरून राजीनामा दिल्यापासून चर्चेत आहेत. त्यांनी म्हटले आहे की त्यांचा राजीनामा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या समर्थनार्थ आहे. "मी त्यांचा अनादर सहन करू शकत नाही." असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

याशिवाय, त्यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या पत्नीशी फोनवर बोलताना हमसूहमसू रडताना दिसत आहेत. राजीनामा दिला आहे, असं ते यावेळी पत्नीला सांगत होते.

या व्हायरल व्हिडिओमध्ये, प्रशांत कुमार सिंह हे फोनवर बोलताना अत्यंत भावनिक झाल्याचे दिसत आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांचा फोन उचलताच त्यांनी त्यांना राजीनामा दिल्याचे सांगितले. "मी ते सहन करू शकलो नाही... मी ते सहन करू शकलो नाही." असं म्हणत त्यांना रडू कोसळते. त्यानंतर ते पुढे असंही म्हणातात की, "आपण ज्यांचे मीठ खातो त्याची जाण राखली पाहीजे...., मी सहन करू शकलो नाही." फोन ठेवल्यानंतर प्रशांत सिंह म्हणाले, "माफ करा, मी माझ्या पत्नीशी बोलत होतो." मला दोन मुली आहेत आणि मी दोन रात्री झोपलो नव्हतो. मला खूप वेदना होत होत्या.

Ayodhya GST Deputy Commissioner Prashant Kumar Singh seen emotional while speaking to his wife after submitting his resignation, video goes viral online.
KL Rahul retirement talks: केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्त होणार? ; जाणून घ्या, त्याने स्वतःच याबद्दल नेमकं काय सांगितलय

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात प्रशांत कुमार यांनी त्यांच्या राजीनाम्याची कारणे सहा मुद्द्यांमध्ये नमूद केली आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की ते सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या निषेधार्थ त्यांच्या पदाचा राजीनामा देत आहेत.

Ayodhya GST Deputy Commissioner Prashant Kumar Singh seen emotional while speaking to his wife after submitting his resignation, video goes viral online.
Vinod Tawde News : भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नितीन नवीन यांचा निर्णय; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!

प्रशांत कुमार सिंह यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९७८ रोजी उत्तर प्रदेशातील मऊ येथे झाला. त्यांनी जीवन राम इंटर कॉलेजमधून हायस्कूलचे शिक्षण घेतले. वाराणसीतील उदय प्रताप महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. २०१३ मध्ये ते सेवेत रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग सहारनपूर येथे होती. २०२३ मध्ये प्रशांत कुमार सिंह यांची पोस्टिंग अयोध्या येथे झाली होती. प्रशांत कुमार सिंह २०२३ पासून अयोध्या विभागात राज्य कर विभागाचे विभागीय उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना एक मेहनती अधिकारी मानले जाते. त्यांनी यांनी स्पष्ट केले की त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता. हा निर्णय त्यांच्या स्वाभिमान आणि त्यांच्या स्वतःच्या विचारांवर आधारित घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com