
July 2025 Prediction: जुलै २०२५ हा केवळ भविष्यातील एक महिना नाही, तर एक इशारा आहे. जेव्हा ग्रहांची हालचाल, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आणि जागतिक घटना एकाच दिशेने संकेत देत असतील, तेव्हा हा केवळ योगायोग असेल, असं म्हणता येणार नाही.
बाबा वेंगा (Baba Vanga) या एक दृष्टीहीन भविष्यकार होत्या, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त असल्याची श्रद्धा आहे. त्यांनी आपल्या जीवनकाळात अनेक मोठ्या घटनांची भविष्यवाणी केली होती, ज्यात ९/११ च्या हल्ल्यापासून ते रशिया-युक्रेन युद्धापर्यंतच्या घटनांचा समावेश आहे. २०२५ बद्दलही त्यांनी चेतावणी दिल्या आहेत.