
गोंडस हत्तीच्या पिल्लूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्याच्या खोडकर कृतीने लाखो नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येतेच
Trending Video : एका लहानशा हत्तीच्या पिल्लूने आपल्या खट्याळपणाने सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. हा गोंडस व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती या चिमुकल्या हत्तीला प्रेमाने जवळ बोलवते पण हे खोडकर पिल्लू मस्तीच्या मूडमध्ये आहे. पळत येऊन त्या व्यक्तीच्या मिठीत जाण्याऐवजी ते चक्क बाजूला सरकते आणि आपल्या गोंडसपणाने सर्वांना हसवते.