

baby elephant viral video
Sakal
Baby elephant viral video: बालिशपणा हा केवळ मानवांपुरता मर्यादित नाही, तर तो विविध प्राण्यांमध्येही दिसून येतो आणि वेळोवेळी तो दिसून येतो. अशा प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जो अतिशय गोंडस आणि हृदयस्पर्शी आहे. या व्हिडिओमध्ये, दोन हत्तीचे पिल्ले लहान मुलांसारखे चिखलात खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोणत्याही प्राणीसंग्राहलयातील नाही तर जंगलातील आहे. जिथे पावसाळ्यानंतर, एका चिखलाच्या टेकडीचे रूपांतर हत्तींच्या पिल्लांसाठी स्लाइड्स असलेल्या प्ले ग्राउंडसारखे झाले आहे.