Viral Video : गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा मोठा आवाज अन् वर्गातच ७ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; CCTCV फुटेज व्हायरल

Visarjan DJ : मोठ्या आवाजातील डीजेमुळे ७ वर्षीय विद्यार्थिनीची प्रकृती वर्गात अचानक बिघडल्याची घटना समोर आली आहे. वैष्णवी तिवारी ही इयत्ता दुसरीत शिकत होती आणि वर्गात दोन वेळा बेशुद्ध पडल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
CCTV Footage Shows Student Collapsing Twice

CCTV Footage Shows Student Collapsing Twice

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान वाजवल्या जाणाऱ्या डीजेच्यामोठ्या आवाजामुळे एका शाळकरी मुलीची प्रकृती बिघडली आणि वर्गातच तिचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर वर्गातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विद्यार्थिनी दोन वेळा बेशुद्ध पडताना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरू केला आहे; मात्र, डीजेचा मोठा आवाज आणि विद्यार्थिनीचा मृत्यू यांच्यातील थेट संबंध अद्याप स्पष्ट झालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com