'तेरे बिना मरजावां !' प्रेयसीच्या घरासमोर रील बनवून तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Crime News

प्रेमात वेडा झालेल्या 20 वर्षीय तरुणानं प्रेयसीच्या घराजवळ विष प्राशन करून आत्महत्या केलीय.

'तेरे बिना मरजावां !' प्रेयसीच्या घरासमोर रील बनवून तरुणाची आत्महत्या

प्रेमात वेडा झालेल्या 20 वर्षीय तरुणानं प्रेयसीच्या घराजवळ विष प्राशन करून आत्महत्या केलीय. मरण्यापूर्वी शुभमनं इंस्टाग्रामवर (Instagram) 'तेरे बिना मरजावां...' गाण्याची रीलही शेअर केलीय. त्यानं रीलमध्ये स्वतःचा आणि त्याच्या मैत्रिणीचा फोटो टाकला होता.

शुभमनं विष प्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शुभमला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. प्रेयसीचे कुटुंबीय शुभमला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते, असं शुभमच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. ही घटना यूपीमधील झाशीची (UP Jhansi) आहे.

हेही वाचा: मोदींनी गुलामगिरी संपवली, काँग्रेस राहिली असती तर अयोध्येत राम मंदिर कधीच बनलं नसतं - CM योगी

मैत्रिणीच्या घरी जाऊन विष प्राशन

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम वर्मा उर्फ ​​गोलू हा झाशीतील बरागांवच्या मास्टर कॉलनीत राहत होता. तो एका मेडिकल स्टोअरमध्ये कामालाही होता. मिशन कंपाउंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. बुधवारी दुपारी शुभमनं इन्स्टाग्रामवर रील अपलोड केली. यामध्ये शुभमनं स्वतःचा आणि प्रेयसीचा फोटो टाकला होता. 'तेरे बिना मरजावां...' हे गाणं रीलमध्ये लावण्यात आलं होतं. यानंतर तो दुचाकीवरून मिशन कंपाऊंडमध्ये गेला आणि तिथं मैत्रिणीच्या घरी जाऊन विष प्राशन केलं.

खिशात सापडली विषाची बाटली

शुभमचा मोठा भाऊ उमेशच्या म्हणण्यानुसार, "प्रेयसीच्या वडिलांनी फोन करून शुभमच्या मित्राला भावानं विष प्राशन केल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो. शुभमची दुचाकी तिथं पार्क केलेली आढळून आली. आजूबाजूला शोध घेतल्यानंतर, शुभम जमिनीवर पडलेला आढळून आला. त्याच्या खिशात विषाची बाटली आढळून आली."

हेही वाचा: Gujarat Assembly Election : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता; EC ची आज पत्रकार परिषद

मृत्यूसाठी मैत्रिणीच्या कुटुंबीयांना धरलं जबाबदार

उमेश म्हणाला, "आम्हाला घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर सर्वजण शुभमला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. त्यामुळं शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे." शुभमचे वडील आणि भाऊ उमेश यांनी त्याच्या मृत्यूसाठी मैत्रिणीच्या कुटुंबीयांना जबाबदार धरलं आहे. मुलीचे कुटुंबीय शुभमला अनेकदा धमकी देत ​​होते, असा त्यांचा आरोप आहे.