
भारतात सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये बंगळुरु हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिलेने सांगितले की ती तिच्या मैत्रिणीला विमानतळावर सोडण्यासाठी आली होती, तिला बंगळुरूहून दुबईला विमानाने जायचे होते. पुढे, महिलेने सांगितले की माझी मैत्रिण बंगळुरूहून दुबईला पोहोचली आहे, पण मी अजूनही ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. महिलेची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, लोक तिच्या पोस्टवर कमेंट्स देखील करत आहेत.