
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये भैया गायकवाड याला टोळक्याने एकट्यात गाठून मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते संतप्त झाले असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
एका नेटकऱ्याने लिहिलं, “झालेल्या मारहाणीचा जाहिर निषेध आहे. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना अटक करावी.” दुसऱ्या एका चाहत्याने संताप व्यक्त करत म्हटलं, “येवल्याचं नाव भैया गायकवाडमुळे चांगल्या कारणासाठी घरोघरी पोहोचलं होतं. त्याला मारहाण करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी कठोर शिक्षा करावी.”