
An ex-Army man from Gaya district in Bihar leads his own symbolic funeral procession to highlight social issues and self-reflection on life and death.
esakal
Ex-Army Man’s Unusual Funeral Procession in Gaya: बिहारमधील गया जिल्ह्यातील कोंची गावात दोन दिवसांपूर्वी एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वजण चक्रावले आहेत. या गावातील ७४ वर्षीय माजी सैनिक मोहनलाल यांची फुलांनी, हारांनी सजवलेली अर्थी बँडबाजासह लोक घेऊन निघाले होते. अंतयात्रेत सहभागी लोक राम नाम सत्य देखील म्हणत होते. मोहनलाल आता या जगात नाहीत, या विचाराने लोक दु:खी होते.
परंतु जेव्हा ही अंतयात्रा स्मशानात पोहचली, तेव्हा मोहनलाल ताडकन उठून उभा राहिले, हे पाहून सर्वजण प्रचंड हादरले, अनेकांना तर क्षणभर भीतीही वाटली. नेमकं काय घडतय कुणालाच कळेना. अखेर मोहनलाल यांनी स्वत: हसून लोकांना म्हटलं की, मी केवळ एवढंच बघू इच्छित होतो की, माझ्या अंतयात्रेत कोणकोण येतं.
मोहनलाल यांनी जिवंतपणी आपली अंतयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. ते याबाबत सांगतात, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंतयात्रेस कितीजण येतात, हे त्याला कधीच समजत नाही. परंतु मी हे माझ्या डोळ्याने पाहू इच्छित होतो, की माझ्या अंतयात्रेस किती जण आले आहेत. त्यामुळेच त्यांनी संपूर्ण तयारीनिशी स्वत:च्या अंतयात्रेचे आयोजन केले होते.
अंतयात्रा स्मशानात पोहचल्यानंतर मोहनलाल यांनी आलेल्या लोकांसमोरच स्वत:च्या प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले. एवढच नाहीतर आलेल्या सर्वांसाठी भोजनाचीही व्यवस्था केली होती. या या चक्रावून टाकणाऱ्या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तर सोशल मीडियावर या घटनेच्या बातम्याही प्रचंड व्हायरल होत आहेत.
मोहन लाल यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. एक मुलगा कोलकाता येथे डॉक्टर आहे, तर दुसरा मुलगा शिक्षक आहे आणि त्यांची मुलगी धनबाद येथे राहते. त्यांच्या पत्नीचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
मोहन लाल यांनी सांगितले की, पावसाळ्यात, अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना खूप अडचणी येत असत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चाने गावात एक सुसज्ज मुक्तिधाम बांधले. शिवाय, मोहनलाल हे बऱ्याच काळापासून समाजसेवेत आहेत आणि लोकांना मृत्यू हा एक उत्सव म्हणून, शांती आणि सकारात्मकतेने पाहावा अशी त्याची इच्छा आहे. गावकरी म्हणतात की मोहन लाल यांचे हे कार्य केवळ अद्वितीयच नाही तर संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार जीवन आणि मृत्यू या दोन्हीकडे सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.