Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

एका विषारी सापानं एका मजुराला दोनदा चावा घेतला पण तरुणानंतर त्या सापाला तीनदा चावा घेतला, यात सापाचा मृत्यू झाला.
Snake Bite
Snake Bite

पाटणा : शेतात काम करताना किंवा अडगळीची ठिकाणं हा सापासारख्या प्राण्यांचा आधिवास असतो. अनेकदा या ठिकाणी काम करताना सापानं माणसाला चावा घेतल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. पण बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली आहे.

एका मजुराला एका विषारी सापानं दोनदा चावा घेतला. पण नंतर या मजूर तरुणानं संबंधित सापालाच तीनदा चावा घेतला. यामध्ये सापाचा मृत्यू झाला. नावडा जिल्ह्यातील राजौली भागात ही घटना घडली आहे. (Bihar Incident of Snake bites man and man bites back snake died but what happened to the young man need to know)

Snake Bite
BCCI Reply to Aditya Thackeray: "वर्ल्डकप फायनल मुंबई बाहेर नेऊ नका" म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना BCCIचं उत्तर

संतोष लोहार असं या मजुराचं नाव असून तो राजौली इथ सुरु असलेल्या एका रेल्वे लाईनच्या प्रकल्पासाठी काम करत होता. काम आटोपल्यानंतर तो आपल्या लेबर कॅम्पमध्ये झोपला होता. याठिकाणी झोपेत असतानाच त्याला एका विषारी सापानं चावा घेतला. चावा घेतल्यानंतर सापानं तिथून पळून जाण्यापूर्वीच संतोषनं त्याला एका लोखंडी सळईच्या मदतीनं पकडलं आणि त्यालाच चावा घेतला. एकदा नव्हे तर चक्क तिनदा त्यानं सापाला चावा घेतला, त्यामुळं सहाजिकच सापाचा मृत्यू झाला.

Snake Bite
Eknath Shinde: "सुर्याचा कॅच कोणी विसरणार नाही तसंच आम्ही 50 जणांनी..."; CM शिदेंची राजकीय फटकेबाजी

या घटनेनंतर जेव्हा तरुणाला त्याच्या या विचित्र कृतीबद्दल विचारलं असता त्यानं सांगितलं की, माझ्या गावाकडं असं मानलं जातं की जर साप तुम्हाला चावला तर तुम्ही लगेचच त्याला चावायचं त्यामुळं आपल्या शरिरात गेलेलं सापाचं लगेच उतरतं.

Snake Bite
Ajit Pawar : "सुर्यानं झेल घेतला नसता तर रोहित शर्मानंच नाहीतर आम्ही पण..."; अजित पवारांची विधान भवनात फटकेबाजी

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संतोषला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. या विचित्र घटनेची बातमी बघता बघता परिसरात वेगानं पसरली. त्यानंतर त्याची कहानी ऐकण्यासाठी लोकांची गर्दी रुग्णालयात जमा झाली. संतोष हा झारखंडचा रहिवासी असून तो या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर येत आहे, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. सतीश चंद्र यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com