Viral News : सगळीकडं पोरीच पोरी पेपर लिहायचा कसा? 'तो' बेशुद्धच पडला, थेट हॉस्पिटलात

परिक्षेची भीती कुणाला वाटत नाही, भरपूर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात देखील धाकधूक असते आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांच्याविषयी तर काही विचारुच नका.
Viral News
Viral Newsesakal

Nalanda Boy Fainted In Inter Exam : परिक्षेची भीती कुणाला वाटत नाही, भरपूर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात देखील धाकधूक असते आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांच्याविषयी तर काही विचारुच नका. यासगळ्यात एक वेगळीच बातमी समोर आली आहे. त्यामध्ये परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला हॉलमध्ये जे काही दिसलं यामुळे तो कमालीचा घाबरून गेला.

सोशल मीडियावर त्या एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनिष (नाव बदलले आहे) नावाच्या त्या विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपल्या आजुबाजूला सगळ्या विद्यार्थीनीच असल्याचे दिसून आले. तब्बल तीनशेहून अधिक विद्यार्थीनीमध्ये त्याला पेपर लिहायची वेळ आली. त्यानंतर त्याची अवस्था झाली यामुळे तो थेट हॉस्पिटलमध्येच दाखल झाल्याचे दिसून आले आहे.

Also Read - ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले

परीक्षा हॉलवर गेल्यापासून मनिष अस्वस्थ होता. ज्या विषयाचा पेपर द्यायचा आहे त्याचा अभ्यास झाला होता. मात्र हॉलमध्ये सगळीकडे मुली पाहून तो अस्वस्थ झाला. आपण एकटेच विद्यार्थी पेपर देणार आहोत बाकी सगळ्या मुली आहेत यामुळे त्याला भीतीच वाटू लागली. पेपर जेव्हा सुरु झाला तेव्हा त्याला आणखी अस्वस्थ वाटले. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Viral News
Viral : "करिश्मा माझी आहे, वरात घेऊन आलास तर..." प्रियकराची नवरदेवाला जाहीर धमकी

मनीषचे डोके प्रचंड दुखू लागले. त्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो परीक्षा हॉलमध्येच चक्कर येऊन पडला. तातडीनं ती गोष्ट त्याच्या घरच्यांना कळवण्यात आली. ही गोष्ट आहे बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील. ब्रिलियंट कन्व्हेंट स्कुलमधील त्या घटनेनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मनीष हा इक्बाल कॉलेज बिहारचा विद्यार्थी आहे. त्यावेळी त्या परिक्षा हॉलमध्ये पेपर लिहिणारा एकमेव मुलगा हा मनिष होता. याच गोष्टीनं त्याला सगळ्यात जास्त अस्वस्थ केले असे त्याच्या घरच्यांचे म्हणणे आहे.

Viral News
Viral Video : 'तुमची कंडिशन काय, बोलता काय?' राहुल-अथियाच्या आहेरावरुन पाकिस्तानी न्युज चॅनेलवर वाद

खरं तर यात चूक मनिषची आहे. त्यानं जेव्हा फॉर्म भरला तेव्हा त्यामध्ये मेल ऐवजी फिमेल कॅटगिरी निवडली होती. त्यामुळे त्याच्या प्रवेशपत्रावर तसाच उल्लेख आला जो त्यानं यापूर्वी केला होता. आणि त्याचे परीक्षा केंद्र हे मुलींची परीक्षा ज्याठिकाणी घेतली जाते तिथे गेले. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Viral News
Viral Photos : अर्थमंत्र्यांच्या साड्यासुध्दा नोटांना मॅचिंग...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com