Trending News: अशी शाळा जिथं विद्यार्थी आणि प्राणी एकत्रच शिकतात; नक्की काय आहे प्रकरण?

एक शाळा अशीही आहे, जिथे मुलांसोबत प्राणीही फिरतात आणि कधी म्हैस तर कधी डुक्कर असे प्राणीही मुलांसोबत शाळेत येतात.
Trending News Bihar Jamui School
Trending News Bihar Jamui SchoolSakal

बिहारमधून एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. इथं लहान मुलं आणि जनावरं एकत्रच शिक्षण घेताना दिसत आहेत. आश्चर्य वाटून घेऊ नका. या मागचं कारण लक्षात आलं तर तुम्हालाही वाईट वाटेल. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकही त्रस्त झाले आहेत.

दररोज सकाळी शिक्षक व मुले शाळेत पोहोचत आहेत. ऑनलाइन हजेरीही नोंदवली जात असून शाळांमध्ये चमक दिसून येत आहे. पण आजही अशा अनेक शाळा आहेत, ज्यात मुलांची आणि शिक्षकांची परिस्थिती हजेरीबाबत सुधारली आहे. मात्र आजतागायत शाळांची स्थिती सुधारलेली नाही. त्यापैकी एक शाळा अशीही आहे, जिथे मुलांसोबत प्राणीही फिरतात आणि कधी म्हैस तर कधी डुक्कर असे प्राणीही मुलांसोबत शाळेत येतात. (Trending News)

असंच चित्र जिल्हा मुख्यालयात असलेल्या कल्याणपूर इथल्या उत्तरमित माध्यमिक विद्यालयात रोज पहायला मिळत आहे. जिथे मुलं तसंच प्राणी शाळेत फिरताना दिसतील. जमुई जिल्हा मुख्यालयातील ही माध्यमिक शाळा कल्याणपूर ही लोकप्रिय शाळांपैकी एक आहे. जिथं एक शिक्षक जितेंद्र शार्दुल त्यांच्या शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे चांगलाच व्हायरल झाला आहे.

Trending News Bihar Jamui School
Trending News: ७८ वर्षांचे आजोबा पुन्हा बसले वर्गात; रोज तीन किलोमीटर चालत जातात शाळेला

या शाळेत सुमारे ३०० मुलांची नोंदणी असून मुलांची उपस्थितीही दररोज चांगली आहे. मात्र शाळेत सुविधांचा अभाव असल्याने मुलांसोबतच जनावरंही शाळेत वावरताना दिसतात. शाळेच्या आवारामागे असा नाला वाहतो, तो या प्राण्यांसाठी तलावासारखा आहे. जिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्राणी आंघोळ करताना आणि पोहताना दिसतील.

नाल्यातून येणाऱ्या दुर्गंधीमध्येच मुलं अभ्यास करतात, अशी शाळेची अवस्था आहे. सीमाभिंत नसल्यामुळे मुलंही सुरक्षित नसून कोणताही भटका प्राणी शाळेत शिरतो. याबाबत विभागाला अनेकदा पत्रं लिहिली आहेत, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नसून आजतागायत शाळेची अवस्था जैसे थेच असल्याचं इथल्या शिक्षकांचं म्हणणं आहे. शाळेत अनेक लहान मुलं आहेत ज्यांना प्राणी इजा करू शकतात. या सर्व भीतीच्या वातावरणात मुलांना रोज शाळेत यावं लागतं आणि या वातावरणात मुलं शिक्षण घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com