
Bihar Lady Teacher Bribe Viral Video: तुम्ही अनेकदा तुमच्या शिक्षकांकडून किंवा अनेक लोकांकडून ऐकले असेल की, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, पण जर काही लोक त्यावर पूर्ण नियंत्रणाचा करू लागले तर परिस्थिती गंभीर होईल. खऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही. किंवा शिक्षणाविषयी नकारात्मक भावना निर्माण होईल. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने हेच सिद्ध केले आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना गुण देताना दिसत आहे, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.