
अपघात झाला, गाडी पेटली, गाडीसोबत चालकालाही आग लागली अन्...; थरारक CCTV Footage Viral
आयुष्यात कोणत्या वेळी काय होईल याची शाश्वती नसते. अनेकदा अचानक अपघात होऊन अनेकांचे जीव जात असतात. तर अनेकजण मरणाच्या दाढेतून बाहेर येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये गाडीला आग लागल्याचं दिसत आहे.
झालेला अपघात हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका चौकात रस्ता ओलांडत असताना एक दुचाकीस्वार घसरून पडतो. पडल्या पडल्या दुचाकीने पेट घेतला असून दुचाकीची आग चालकालाही लागल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
त्यानंतर चालक अंगाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण दुसऱ्या एका व्यक्तीने या तरूणाची मदत केली आहे. या तरूणाला वेळेवर मदत मिळाली नसती तर या दुर्घटनेत भाजून या तरूणाचा जीव गेला असता.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून शेअर केला जात आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.