

लंडनहून ढाक्याकडे जाणाऱ्या 'बिमान बांगलादेश एअरलाईन्स'च्या विमानात दोन प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विमान प्रवासादरम्यान किरकोळ शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याने काही काळ विमानात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे विमानातील इतर प्रवाशांमध्ये, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये घबराट पसरल्याची माहिती आहे.