लय भारी मित्रा...! भावाचा वाढदिवस मग राडा तर झालाच पाहिजे, पठ्ठ्याचं हटके सेलिब्रेशन, नेटकरी म्हणाले.. 'भाई... बचपन की याद आ गया'
birthday celebration in train viral video: सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो तरुण त्याच्या वाढदिवसानिमित्त केक, समोसे, चॉकलेट प्रवाशांना वाटताना दिसत आहे.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण काही असे असतात जे थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करताना दिसतोय.