

Mocked but Unstoppable: Young Man Cleans Entire River Alone and Wins Praise
esakal
मध्य प्रदेशातील बियाओरा या छोट्या शहरात राहणारा २० वर्षांचा तरुण बिट्टू तबाही याने लोकांच्या टिंगल-टवाळीला आणि टीकेला न जुमानता एक घाणेरडी नदी पूर्णपणे स्वच्छ करण्याचे काम एकट्याने पूर्ण केले आहे. ज्या ठिकाणी लोक फक्त तक्रारी करत बसतात, तिथे बिट्टूने कृती करून दाखवले की, एक व्यक्तीही मोठा बदल घडवू शकते. त्याच्या अथक मेहनतीमुळे आता अजणारा नदीचे पाणी पूर्वीपेक्षा खूप स्वच्छ झाले आहे आणि प्रदूषणाचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.