'अजित पवार मराठा पण फडवणीस भारी'; 'त्या' खासदाराची Audio Clip Viral

Audio Clip Viral
Audio Clip ViralSakal
Updated on

अजित पवार जरी मराठा असले तरी फडणवीस भारी आहेत असं वक्तव्य भाजपच्या एका खासदाराने आपल्या कार्यकर्त्याला बोलताना केलं आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Audio Clip Viral
पुणेकरांनो सावधान! ट्रेकला गेलेला तरूण पुराच्या पाण्यात गेला वाहून; घटनेचा थरारक Video Viral

"अजित पवार गटाला हिंदुत्वाचं काही घेणं देणं नाही मग त्यांना भाजपमध्ये प्रवेश कसा दिला. भाजप तर हिंदुत्वाच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. त्यांचा प्रवेश नाकारायला पाहिजे होता." असा प्रश्न कार्यकर्त्याने विचारल्यावर धुळे येथील भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Audio Clip Viral
"औरंगजेबाने 52 वर्षे अखंड हिंदुस्तानवर राज्य केलंय, ते माझे आदर्श"; BRS नेत्याचं वादग्रस्त विधान

उद्या अमित शाह ओवैसींनापण पक्षात घेतील आणि जलील यांना कायदेमंत्री करतील, असं चालेल का? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला, त्यानंतर असं काही होणार नाही, आपल्याला फक्त भाजपला मतदान करून मोदींना निवडून द्यायचं आहे असं भामरे म्हणाले. त्यावर कार्यकर्ता म्हणाला, अजित दादा भारी आहेत त्यांच्या पाठीमागे मोठा मराठा समाज आहे. त्यावर, "अजित दादांपेक्षा आपले देवेंद्र फडणवीस भारी आहेत." असं ते या कार्यकर्त्याला म्हणाले आहेत.

"तुम्ही राष्ट्रवादीच्या आमदाराला सुरत गुवाहटीला नेलं नाही, त्यांना झाडी, डोंगर दाखवलं नाही, तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला" असंही कार्यकर्ता भामरे यांना म्हणाला.

दरम्यान, अजित पवार हे राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजप शिंदे सरकारसोबत सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ३५ च्या आसपास आमदार असून पक्षावरही अजित पवार गटाने आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Vijay Chaudhary?
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Boy's Viral Remark to Police Sparks Online Debate
Marathi News Esakal
www.esakal.com