
ब्लिंकिटने रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. हे गुरुग्राममध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या सेवेअंतर्गत आता १० मिनिटांत घराच्या दारात रुग्णवाहिका उभी राहणार आहे. त्यामुळे शहरात आपत्कालीन वैद्यकीय सुविधा लवकर उपलब्ध होणार आहेत. ब्लिंकिटने आवश्यक उपकरणांनी सज्ज असलेल्या पाच रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवल्या आहेत. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, AED, स्ट्रेचर, मॉनिटर्स, सक्शन मशीन आणि आवश्यक औषधे आणि इंजेक्शन्स यांचा समावेश आहे.