

Why Chernobyl Dogs are Turning Blue
sakal
Ukraine Blue Dogs Reason: बऱ्याचदा जगात अनेक अनपेक्षित नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती निर्माण होतात ज्या होण्याचा कधीच कोणीही विचार केला नसेल. जसे की १८१६ मध्ये उन्हाळा ऋतूच आला नव्हता, १९०८ मध्ये सायबेरियातील स्फोटात ८ कोटी झाडं नष्ट झाली, १९४५ मध्ये जपानमधील हिरोशिमा - नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ला.
असंच काहीतरी सध्या युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात मोठ्या आण्विक आपत्तीचे केंद्र म्हणून युक्रेन हा देश ओळखला जातो. तसेच अनेक वर्षांपासून चालू असलेल्या रशिया सोबतच्या युद्धामुळे सुद्धा युक्रेन चर्चेचा विषय जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. आता पुन्हा हा देश चर्चेचं कारण बनला आहे. मात्र, यावेळी कारण खरंच आश्चर्यचकित करणारं आहे.