
एकीकडे ९० तासांच्या कामाच्या आठवड्याच्या मुद्द्यावरून देशात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आणखी एक रंजक प्रकरण समोर आले आहे. या वादात एका कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरने (सीओओ) त्यांच्याच कंपनीतील वर्क कल्चरशी संबंधित एक जुनी घटना सांगितली आहे. त्याने सांगितले की, त्यांच्या जुन्या बॉसने उमेदवाराचा बायोडाटा नाकारला कारण त्यात त्याच्या पात्रतेसह, उमेदवाराने विविध छंद देखील नमूद केले होते. ज्यात गिटार वाजवण्यासारख्या छंदांचा समावेश होता. यावर बॉसने 'तू काम कधी करणार' असे म्हणत काम देण्यास नकार दिला.