Propose in Aeroplane : नाद खुळा! पठ्ठ्याने विमानातच केलं प्रपोज अन् ती म्हणाली..., Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Propose in Aeroplane : नाद खुळा! पठ्ठ्याने विमानातच केलं प्रपोज अन् ती म्हणाली..., Video

आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपण काहीही करू शकतो. जर एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडत असेल तर तो तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो. लहानपणी आवडत्या व्यक्तीला चिठ्ठी दिली किंवा एखाद्या नोटेवर लिहून दिल्याचे प्रकार आपण अनेकदा ऐकले असतील.

पण समोरासमोर प्रपोज करायला अनेकजण घाबरत असतात. सध्या एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने विमानातंच आपल्या आवडत्या मुलीला प्रपोज केलं आहे.

हेही वाचा - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा हातात मोठं पोस्टर घेऊन येताना दिसत आहे. मुलीच्या सीटजवळ आल्यानंतर त्याने तोंडावरील मास्क काढला. त्यानंतर ती मुलगी चकित झाली असून मुलाने तिला आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुलीने हा प्रपोज स्विकार केला असून दोघांनीही मिठी मारून आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Pune German Farmer : महाराष्ट्रातील जर्मन शेतकऱ्याची यशोगाथा; अनोख्या प्रयोगाचं यशस्वी व्यवस्थापन

दरम्यान, हवाई प्रवासातलं प्रेम असं म्हणत नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर या मुलाने विमानात प्रपोज करून वेगळाच विक्रम केलाय.