
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका नवरीने लग्न रद्द केले, ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. लग्नाचे ठिकाण नवरदेवाने कुटुंबाने ठरवले होते. पण तिथे खूप जास्त उकडत होते आणि वातानुकूलित सुविधा नव्हती. त्यामुळे तिने लग्न रद्द केले असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नातील व्यवस्थेवरून झालेल्या किरकोळ मतभेदाचे वादात रुपांतर झाले. त्यामुळे नवरीच्या कुटुंबाने हुंड्याची तक्रार केली. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले पण तोपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले होते आणि नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबात वाद निर्माण झाला.