

Pune University History Marathi
esakal
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत म्हणजे काळाच्या प्रवाहातही आपल्या दिमाखात अढळ उभा असलेला हा वारसा आहे. आजही ही इमारत पाहणाऱ्यांना इतिहासाच्या दारात घेऊन जाते. ब्रिटिशकालीन गव्हर्नर हाऊस म्हणून उभारलेली ही अद्वितीय वास्तू स्थापत्यकलेच्या अप्रतिम सौंदर्याने आणि प्राचीन वैभवाने प्रत्येकाला मोहित करून टाकते.