
Tax Exemption Memes: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरणसह अनेक क्षेत्रासांठी खास घोषणा केल्या. तसेच मध्यमवर्गांयासाठी करबाबत खास घोषणा केली आहे. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. अशी घोषणा सर्वसाधारण अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार याला सूट दिली जाईल. यामुळे सोशल मिडियावर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच सोशल मिडियावर भन्नाट मिम्सचा वर्षाव सुरू झाला आहे.