अग अग म्हशी..! पोलिसांना देखील न जमलेला मालकीचा वाद शेवटी म्हशीनेच मिटवला; काय आहे प्रकरण?

Buffalo Settles Ownership Dispute: अखेर दोन व्यक्तींचा म्हशीच्या मालकी हक्काचा वाद त्या मुक्क्या प्राण्यानेच सोडवला आहे. नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया.
Buffalo
Buffalo

नवी दिल्ली- ऐकायला विचित्र वाटेल, पण एक वाद म्हशीनं मिटवला आहे. गावातील पंचायतीला जमलं नाही, पोलिसांना देखील हा वाद पूर्णपणे सोडवता येत नव्हता. अखेर दोन व्यक्तींचा म्हशीच्या मालकी हक्काचा वाद त्या मुक्क्या प्राण्यानेच सोडवला आहे. नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया.

एका म्हशीवर दोघांनी मालकीचा दावा केला होता. हे प्रकरण पोलिसांकडे गेलं होतं. पंचायतीमध्ये या प्रकरणाचा निकाल लागू शकला नाही. अशावेळी पोलिसांनीच एक नवी युक्ती शोधली. त्यांनी म्हशीला गावात एका ठिकाणी सोडले. काहीवेळाने म्हैस आपल्या खऱ्या मालकाच्या घरी आपोआप आली. त्यामुळे हा वाद मिटला आणि म्हैस खऱ्या मालकाला मिळाली.

Buffalo
स्वागत नहीं करोगे... ढोलताशाच्या तालावर सूर्या अन् पांड्याने धरला ठेका; पोलीस बघतच राहिले... Video Viral

रिपोर्टनुसार, महेशगंज जिल्ह्यातील राय अस्कारपूरचा रहिवाशी नंदलाल सरोज याची म्हैस हरवली होती. म्हैस पुरे हृषिकेश या गावात गेली होती. याठिकाणी हनुमान सरोज याने म्हशीला पकडले आणि आपल्या घरी आणून बांधून टाकले. नंदलालला ही गोष्ट कळाली. त्याने हनुमानकडे म्हैस मागितली, पण त्याने ती दिली नाही. त्यामुळे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं.

नंगलालने महेशगंज पोलीस स्टेशनमध्ये हनुमानच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांना बोलावलं अन् त्यांची चौकशी सुरू केली. पंचायतीमध्ये देखील अनेक तास याबाबत चर्चा झाली, पण दोघांनीही म्हशीवरचा दावा सोडला नाही. अशावेळी एसएचओ शर्वन कुमार सिंग यांनी एक युक्ती सांगितली. त्यांनी म्हटलं की, आपण निर्णय म्हशीवर सोडू. तिला रस्त्यावर सोडू आणि ती ज्या व्यक्तीच्या मागे जाईल त्याला तिचा मालक घोषित करू.

Buffalo
Viral Video: ब्रेक फेल झाला अन् लोकांनी धावत्या गाडीतून उड्या ठोकायला सुरूवात केली; पाहा अमरनाथ यात्रेकरूंबरोबर काय घडले

गावकऱ्यांनी ही युक्ती मान्य केली. नंदलाल आणि हनुमान यांना विरुद्ध दिशेने उभे केले गेले. म्हशीला सोडण्यात आले. त्यानंतर म्हैश राय अस्कारपूरच्या दिशेने नंदलालच्या मागे चालू लागली. त्यानंतर म्हैस नंदलालच्या ताब्यात देण्यात आली. हनुमानची गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी चांगलीच कानउघडणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com