Video Viral : तू कोण आला आमची भांडणं सोडवणारा; दारूड्याला बैलाने दाखवला इंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : तू कोण आला आमची भांडणं सोडवणारा; दारूड्याला बैलाने दाखवला इंगा

एखाद्या गावात फिरत असलेले वळू आपण पाहिले असतील. त्यांना कोण वाली नसतं. ते असंच काहीतरी खाऊन आपली उपजिविका भागवत असतात. तर कधीकधी त्यांच्यामध्ये तुंबळ भांडणं होत असतात. पण गावातील दारूडेसुद्धा त्यापेक्षा जास्तच भारी असतात. दोन वळूमध्ये किंवा बैलामध्ये भांडणं सुरू असल्यावर त्यांना सोडवायला गेलेल्या दारूड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक दारूडा झुलत झुलत दोन बैलांमध्ये चाललेले भांडण सोडवायला जात आहे. बैलाला थांबवण्यासाठी त्याच्या हातात काठी दिसत नाही. तो पुढे गेल्यावर बैलाची टक्कर थांबली खरी पण एका बैलाने या दारूड्याला आपला चांगलाच इंगा दाखवला आहे. त्याने दारूड्याला शिंगावर उचलून फेकले आहे.

हेही वाचा: Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या उपाध्या कुणी आणि कशा दिल्या?

दरम्यान, उचलून फेकल्यावर दारूड्याची चांगलीच जिरली. उचलून फेकल्यानंतर दारूडा एका जागेवर बसला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून कोण आला आमची भांडणं सोडवणारा तू कोण असं म्हणत बैलाने दारूड्याला चांगलंच शिंगावर घेतलं आहे.