Viral Video : चहा पिण्यासाठी पठ्ठ्याने थांबवली बस; पाठीमागे ट्राफिक जाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : चहा पिण्यासाठी पठ्ठ्याने थांबवली बस; पाठीमागे ट्राफिक जाम

तुम्ही चहाप्रेमी आहात का? तुमच्यापैकी अनेकजण चहाप्रेमी असतील किंवा तुमचे मित्रसुद्धा असतील. एखाद्याला जसं दारूचं व्यसन असतं तसं अनेकांना चहाचं व्यसन असतं. चहासाठी ते काहीही करू शकतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका बसचा ड्रायव्हर चहा पिण्यासाठी बस रोडवर सोडून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सदर व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो रस्त्याच्या मध्ये बस थांबवून चहा पिण्यासाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलेला आहे. तर बसच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर ट्राफीक जाम झालं आहे. मागचे वाहने हॉर्न वाजवताना या व्हिडिओत दिसत आहेत. तर बसचा ड्रायव्हर चहाचा कप घेऊन परत गाडीमध्ये चढत आहे.

हेही वाचा: Viral Video : डान्स करताना आंटीचे जोरात ठुमके; पाय घसरला अन् साडी...

दरम्यान, चहा घेऊन गेल्यावर बस ड्रायव्हर गाडी चालू करून पुढे निघून जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तो चहाप्रेमी आहे, तो काहीही करू शकतो अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.