Viral News: अमेरिकेत ड्रग्स तस्करीचा मोठा प्रश्न आहे. याबाबत मोठे कायदे केले असले तरी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी होताना पहायला मिळते. दरम्यान मॅक्सिको सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचं सेवन केलं जातं. अवैधरित्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसतेय. दरम्यान अशातच एक वेगळच प्रकरण समोर आलय. पोकोसी पॅनिटेंशियरी तुरुंगात गार्डने चक्क एका मांजरीला ड्रग्ज तस्करी करताना पकडलंय. आणि तिच्याकडून लाखो रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आलाय.