
ChatGPT Love Letter : प्रप्रोज करण्याचं टेन्शनचं संपलं भावा; ChatGPT लिहून देणार लव्ह लेटर
ChatGPT Love Letter : सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चा आहे ती चॅट जीपीटीची (ChatGPT). या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अनेक कामं सोपी होतील असा दावा केला जात आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
चॅटजीपीटी लाँच झाल्यापासून यावर प्रत्येकजण नवनवीन प्रयोग करून भगत आहेत. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अनेक गोष्टी सोप्या होतील असा दावा केला जात आहे.
या सर्वामध्ये ज्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीला प्रप्रोज करायचे आहे किंवा मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यांच्यासाठीदेखील चॅटजीपीटी महत्त्वाचे प्लॅटफॉर्म ठरणार आहे.
एरवी तुम्ही एखाद्या मुलीने किंवा मुलाने एकमेकांना प्रपोज करण्यासाठी हाताने प्रेमपत्र लिहिलेले पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र, चॅटजीपीटीमुळे आता हाताने प्रेमपत्र लिहिणे इतिहासजमा होणार आहे.
नुकताच चॅटजीपीटीने चक्क प्रेमपत्र लिहिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर प्रेमवीरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सध्या चॅटजीपीटीने लिहिलेल्या प्रेमपत्राची जोरदार चर्चा असून, हे पत्र एखाद्या व्यक्तीने लिहिले आहे की चॅटजीपीटीने याबाबत यूजर्समध्ये संभ्रम आहे.
मॅकॅफीने AI च्या मदतीने प्रेम संबंधांवर पडणाऱ्या प्रभावाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 78% भारतीयांनी हे प्रेमपत्र एका माणसाने लिहिले असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, जगातील प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती प्रेमपत्र लिहिण्यासाठी AI चा वापर करत असल्याची माहितीदेखील सर्वेक्षणात समोर आली आहे.
20 मिनिटांत लिहिला होता 2 हजार शब्दांचा लेख
दुसरीकडे, यापूर्वी, चॅटजीपीटीने एका विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत 20 मिनिटांत 2,000 शब्दांचा लेख लिहून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. याशिवाय चॅटजीपीटीने अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या एमबीए, मेडिकल आणि लॉ या व्यावसायिक विषयांच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
ChatGPT म्हणजे काय?
ChatGPT हे एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल आहे. जे यूजर्सच्या प्रश्नांची सहज आणि अचूक उत्तरे देते. माणसांप्रमाणे प्रतिसाद देण्यासाठी याची रचना करण्यात आली असून, हे टील त्याचे शब्द पुन्हा सांगू शकते तसेच, चूक झाल्यास माफीदेखील मागू शकते.
Google ने सादर केले Bard
दरम्यान, Google ने त्यांची नवीन AI सेवा Bard लाँच करण्याची घोषणा केली आहे. मात्र, नव्या चॅटबॉटमुळे गुगलचे मोठे नुकसान झाले आहे.
Google ची मूळ कंपनी Alphabet Inc च्या नवीन चॅटबॉट बार्डने प्रमोशनल व्हिडिओमध्ये चुकीची माहिती शेअर केली होती. यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात अंदाजे 100 बिलियन डॉलरचे नुकसान झाले.