Viral Video : जवानांनी दिले चॉकलेट, चिमुकल्यांनी ठोकला कडक सॅल्यूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Viral Video : जवानांनी दिले चॉकलेट, चिमुकल्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

लहान मुले खूप निरागस असतात. लहानपणी एखाद्या गोष्टीविषयी चांगलं त्यांना सांगितलं की ते विसरत नाहीत. त्यांना काही गोष्टींबद्दल प्रचंड आदर असतो. अशाच दोन चिमुकल्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोन चिमुकले भारतीय जवानांना कडक सॅल्यूट मारताना दिसत आहे.

(Children salute to indian army after give him chocolate)

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन मुले दिसत असून त्यांचा व्हिडिओ जवानांनी शूट केला आहे. तर या व्हिडिओमध्ये जवान त्यांना चॉकलेट देताना दिसत आहेत. चॉकलेट दिल्यावर ते दोघेजण थँक यू म्हणत आहेत तर जवानांची गाडी पुढे निघाल्यावर जय हिंद म्हणत कडक सॅल्यूट मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.