माणुसकीलाही लाजवेल अशी प्राण्यांची मैत्री; भावनिक Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

माणुसकीलाही लाजवेल अशी प्राण्यांची मैत्री; भावनिक Video Viral

खरी मैत्री म्हणजे काय हो? आजकाल खरे मित्र आपल्याला आपल्या आयुष्यात मिळतात का? धोका देणारे अनेक मित्र मिळतात पण आयुष्याच संकटकाळी मदत करणारे खूप कमी मित्र असतात. तसं पाहिलं तर आपल्यापेक्षा प्राण्यांची मैत्री जास्त कट्टर असते. अशाच एका मैत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(True Friendship viral video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिंपाझी एका कुत्र्याला काहीतरी खायला देत असल्याचं आपल्याला दिसत आहे. कुत्र्याला गोंजारून हा चिंपाझी त्याला मिठी मारत आहे. हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांकडून शेअर केला जात आहे.

दरम्यान, असे मित्र आयुष्यात मिळायला भाग्य लागतं अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. माणुसकीलाही लाजवेल अशी प्राण्यांची मैत्री पाहून आपलंही मन भरून आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर १७ हजार लोकांनी लाईक केलं आहे.