
China Fungus: अमेरिकेत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यानुसार, अमेरिकेत वास्तव्याला असणाऱ्या एका चीनी संशोधक जोडप्यानं एका विशिष्ट पद्धतीच्या बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ही बुरशी साधीसुधी नसून एक प्रकारे जैविक हत्यार असल्याचं सांगितलं जात आहे. याचा वापर करुन अमेरिकेतील कृषी क्षेत्र नष्ट करण्याचा कट असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयनं याबाबत दावा केला आहे.