

Xiao Chen Success Story
esakal
Beijing: भरभक्कम पगार, जगभरच्या प्रवासाची संधी असलेली एअर होस्टेसची नोकरी सोडून आपल्या आईच्या व्यवसायात मदत करणाऱ्या चीनमधील एका महिलेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ वर्षे एअर होस्टेसचे काम केल्यानंतर खेकडे विकण्याच्या व्यवसायात उतरलेली ही महिला आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. जिओ चेन असे या महिलेचे नाव असून, सणासुदीच्या काळात तिच्या कुटुंबाच्या व्यवसायाने एका दिवसात १ लाख चिनी युआनपेक्षा अधिक विक्री नोंदवली. थोडक्यात ही महिला खेकडे विकून दररोज सुमारे १४.४५ लाख रुपये इतकी दणदणीत कमाई करते आहे.