Extramarital Affair : ऑफिसमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवाल तर जाईल नोकरी; कंपनीचा कर्मचाऱ्यांना इशारा

चीनमधील कंपनीने आपल्या सर्व विवाहित कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे.
Extramarital Affair in Office
Extramarital Affair in OfficeeSakal

ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी कंपनी काही नियम ठरवून देते. हे नियम शक्यतो कामासंबंधी असतात. मात्र, चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अगदी विचित्र नियम लागू केला आहे. ऑफिसमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं या कंपनीने म्हटलं आहे.

कर्मचाऱ्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढावी, आणि आपल्या कुटुंबाप्रती ते अधिक प्रामाणिक असावेत या उद्देशाने हा नियम लागू करण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. चीनच्या झेजँग प्रांतातील ही कंपनी आहे. WION या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या कंपनीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

Extramarital Affair in Office
China-Pakistan : आर्थिक टंचाईने अडचणीत असलेल्या पाकिस्तानला एक अब्ज डॉलरची चीनची मदत

काय आहे निर्णय

या कंपनीने आपल्या सर्व विवाहित कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे. ९ जून रोजी याबाबत ऑर्डर जारी करण्यात आली होती. इंटर्नल मॅनेजमेंट सुधारण्यासाठी, वैवाहिक जीवनातील प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देण्यासाठी, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी, आणि कर्मचाऱ्यांचं कामावर अधिक लक्ष रहावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

या आदेशानुसार एखादा विवाहित कर्मचारी ऑफिसमध्ये अफेअर करताना आढळून आला, तर त्याला कामावरून काढण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने चार 'नो' सांगितले आहेत. यात अवैध संबंध, मिस्ट्रेस, विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोट या सर्व गोष्टींसाठी मनाई करण्यात आली आहे.

Extramarital Affair in Office
Donkey Population : चीनमुळे पाकिस्तानात वाढली गाढवांची संख्या; पाहा नेमकं काय आहे प्रकरण

कायदेशीर अडचण

चीनमधील कायदेतज्ज्ञांनुसार, कंपनीचा हा निर्णय लागू करण्यासाठी कायदेशीर अडचण येऊ शकते. कारण चीनमधील कामगार कायद्यानुसार, एखादी कंपनी कामगारांना तेव्हाच कामावरून काढू शकते, जेव्हा तो नेमून दिलेलं काम करत नाही, किंवा करण्यास पात्र राहत नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंध हे कर्मचाऱ्यांना काढण्याचं कारण असू शकत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ शकते.

सोशल मीडियावर चर्चा

कंपनीच्या या निर्णयाची चीनमधील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही लोक कंपनी कर्मचाऱ्यांच्या घरच्यांचा देखील विचार करत असल्याचं म्हणत या निर्णयाचं कौतुक करत आहेत. तर, दुसरीकडे ही कर्मचाऱ्यांची वैयक्तिक बाब असल्याचं म्हणत काही लोकांनी याला विरोध दर्शवला आहे.

Extramarital Affair in Office
Extra Marital Affair : ‘पती पत्नी और वो’, भारतात किती लोकांचे आहे विवाहबाह्य संबंध? संशोधनात धक्कादायक खुलासा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com