इटलीमधील मिलान विमानतळावर एक विचित्र आणि हास्यास्पद घटना घडली आहे. विमानतळावर एका चिनी महिलेनं ओव्हरवेट सामानावरून चक्क जमिनीवर पडून रडायला सुरुवात केली. काही वेळानंतर ती महिला लहान मुलांप्रमाणे ओरडू लागली आणि हात-पाय आपटू लागली. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.