पहिल्यांदा लोकं हसली नंतर रडली! सर्कशीतल्या वाघानं...| Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : पहिल्यांदा लोकं हसली नंतर रडली! सर्कशीतल्या वाघानं...

Trending Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत वन्य प्राण्यांच्या व्हिडिओला नेटकरी पसंत करतात. काही दिवसांपूर्वी वनपर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या वाहनाच्या मागे गेंडा लागला होता. तो व्हिडिओ नेटकऱ्यांना थक्क करणारा होता.

आता एका सर्कशीतला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो ट्रेनर पिंजऱ्यात बसलेल्या वाघांना ट्रेनिंग देतो आहे. त्याच्या वेगवेगळ्या करामती पाहून प्रेक्षकांना हसू येते. ते त्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देताना दिसून येतात. मात्र त्याचवेळी जे काही घडते ते पाहून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. वाघा सारख्या प्राण्याला काही शिकवायला जाणे किती धोकादायक असू शकते हे त्यातून दिसून आले आहे.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सोशल मीडियावर लाखो नेटकऱ्यांना धक्का देणारा तो व्हिडिओ इटली प्रांतातील आहे. लाईव्ह परफॉर्मन्समध्ये घडलेल्या त्या घटनेनं प्रेक्षक स्तब्ध झाले आहेत. जे प्रेक्षक काही सेकंदापूर्वी खळखळून हसत होते त्याची जागा आक्रोश आणि किंकाळ्यांनी घेतल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्स देखील तितक्याच हदयद्रावक आहेत. तो व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा आल्याचे म्हटले आहे.

वास्तविक वाघ, सिंह, बिबट्या, चित्त्ता यांना सर्कशीमध्ये सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र त्यात बऱ्याचदा संबंधित एखाद्या प्राण्याचा मूड कसा आहे हे पाहणे देखील महत्वाचे ठरते. आताही तसेच काहीसे झाले आहे. रिंगमास्टरला त्याचा काही अंदाज आला नाही. तो सुरुवातीला त्या वाघाशी खेळतो आहे. त्याच्याशी मस्ती करतो आहे. मात्र अचानक जे झालं ते अवाक् करणार आहे. श्वास रोखून ठेवणारे आहे.

Viral Video

Viral Video

शेवटी वाघ तो वाघच असतो हे पुन्हा एकदा त्या व्हिडिओवरुन दिसून आले आहे. वाघानं त्या रिंगमास्टरचे मानगुट पकडले आहे. रिंगमास्टर जीव वाचविण्यासाठी ओरडतो आहे. प्रेक्षकांना सुरुवातीला हा सगळा विनोद वाटतो. मात्र त्यानंतर आपण जे काही पाहत होतो ते भलतेच भयाण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते दृष्य पाहताच पडद्याच्या मागे असलेली माणसं धावत येतात आणि त्याचा जीव वाचवतात. ४५ सेकंदाच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना घाबरवून टाकलं आहे.