Viral : शाळेत चतुर कावळ्याची गोष्ट ऐकलीये ना? आता 'त्या'चा खरा Video पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crow

Viral : शाळेत चतुर कावळ्याची गोष्ट ऐकलीये ना? आता 'त्या'चा खरा Video पाहा

लहानपणी आपण शाळेत असताना प्रत्येकाने हुशार कावळ्याची गोष्ट ऐकली असेल. तहानलेला कावळा कशा पद्धतीने आपल्या चुतराईने माठातील तळात असलेलं पाणी वर आणतो आणि पितो हे आपल्याला चांगलंच माहिती असेल. पण एवढा हुशार एखादा कावळा असतो का? याचा आपण कधी विचार केला आहे का?

हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

सध्या अशाच हुशार कावळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो एका बाटलीत अर्ध भरलेलं असलेलं पाणी त्यामध्ये दगड टाकून वर आणताना दिसत आहे. कावळा बाटलीत अनेक दगडं टाकताना दिसत आहे. तर पाणी वर आल्यानंतर तो पाणी पिताना दिसत आहे. त्यामुळे शाळेत शिकवेलल्या खऱ्या कावळ्याचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.