Viral Video : गाडीवरून जाताना डोक्यात पडला नारळ अन्...; व्हिडिओ पाहून हेल्मेटचं महत्त्व कळेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

गाडी चालवताना आपण हेल्मेट घातलं पाहिजे असं कित्येकजण बोलतात. पण हेल्मेट घालून गाडी चालवणारे खूप कमी असतात. हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांना अपघातात आपले जीव गमवावे लागले आहेत. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

Viral Video
Video Viral : मुस्लीम तरूणीसोबत का फिरतोस? अशी विचारणा करत हिंदू तरूणाला मारहाण

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दुचाकी ग्रामीण भागातील रस्त्यावरून जाताना दिसत आहे. तर या रस्त्यावरून समोरून एक दुचाकी येत असताना त्याच्या डोक्यावर एक नारळाचं फळ पडतं आणि ती गाडी रस्त्याच्या खाली जाते. या अपघातामध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा ४ ते ५ सेकंदाचा व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल.

हा व्हिडिओ पाहून आपणच हेल्मेट वापरायचं की नाही ते ठरवा. या व्यक्तीच्या डोक्यात हेल्मेट असतं तर या व्यक्तीचा जीव वाचला असता आणि जास्त जखमही झाली नसती हे आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच जाणवेल. त्यामुळे गाडी चालवताना संपूर्ण सुरक्षित प्रवास आणि वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. सध्या हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com