
सैयारा या नवीन चित्रपटाने थिएटरमध्ये लोकांना भावनिक आणि रोमँटिक भावनांमध्ये बुडवले आहेच, परंतु त्याचा परिणाम थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही दिसून येतो. सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये चित्रपट संपल्यानंतर, एक मुलगा त्याच्या प्रेयसीला हातात घेऊन थिएटरमध्ये फिरताना दिसतो. या जोडप्याचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. तसाच अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा पाहून नेटकऱ्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.