Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

couple sitting on railway track and train starts moving : व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल हा तर मूर्खपणाचा कळस; बघा नेमकं काय घडलं?
“A couple sitting dangerously close to the railway tracks moments before the train begins moving, captured in a viral video.”

“A couple sitting dangerously close to the railway tracks moments before the train begins moving, captured in a viral video.”

esakal

Updated on

couple on tracks viral video : आजकाल आपल्याला सोशल मीडियावर कधी काय दिसेल, हे काही सांगता येणार नाही. जगभरात दररोज अगदी क्षणक्षणाला असंख्य घटना, घडामोडी घडत असतात ज्यापैकी कित्येक तरी खळबळजनक, धक्कादायक किंवा पाहणाऱ्याचं कधीकधी डोकंही सून्न करणाऱ्या असू शकतात. अशाच काहीशा एका घटनेचा व्हिडिओ सधाय सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

असं म्हणतात प्रेम आंधळ असतं, प्रेमात पडलेल्यांना जगाचा भान उऱत नाही. याचा प्रत्यय या हा सोसल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून येतो. एक प्रेमी जोडपं एकमेकांवर प्रेम करण्यासाठी चक्के एका मालवाहू रेल्वेखाली रूळावर जाऊन बसलं. ते दोघे एकमेकांवर प्रेम करण्यात एवढे काही गुंतले होते की, आपण कुठं बसलोय, काय घडू शकतं याचंही त्यांना जराही भान उरलं नव्हतं.

अखेर घडलंही तसंच..ते दोघे एकमेकांमध्ये मश्गूल झालेले असताना, अचानक  रेल्वे सुरू झाली आणि क्षणात पुढेही निघाली.. नशीब बलवत्तर म्हणून कसेबसे ते दोघे धडपडत, दगडांवर घसरत एकमेकांना धरून रेल्वे रूळापासून बाजूला झाले आणि रेल्वे मार्गस्थ झाली. मात्र आणखी क्षणाचाही विलंब झाला असता तर या प्रेम प्रकरणात त्यांचं फुकटचं आणि कायमचं तिकीट कटलं असतं, एवढं नक्की होतं.

“A couple sitting dangerously close to the railway tracks moments before the train begins moving, captured in a viral video.”
Hinjewadi IT Park bus accident : पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर हे कृत्य रीलसाठी केले असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. तर काहीजण म्हणातय हा एआय जनरेटेड व्हिडिओ आहे. काहींनी त्या जोडप्याला आत्महत्या करायची असावी असाही अंदाज काढला..अशाप्रकारे विविद प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटत आहेत.  हा व्हिडिओ X-प्लॅटफॉर्मवर @nehraji77 नावाच्या अकाउंटने पोस्ट करण्यात आला आहे. तर तो लाखों लोकांनी बघितला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com